(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
👀 आता UPI पेमेंटवर मर्यादा येण्याची चिन्हं :
आता UPI पेमेंटवर निर्बंध येण्याची तयारी सुरु आहे. बँक व्यवहाराप्रमाणेच UPI पेमेंट मर्यादा घालण्याचा संबंधित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी बोलणी सुरु आहेत. सध्या डिजिटल युगात सर्व काम ऑनलाईन होतात. अगदी घरातील वस्तूंच्या खरेदींपासून ते बँकेच्या कामांपर्यंत सर्व काम ऑनलाईन होतात. युपीआय पेमेंटवर सध्या बहुतेक नागरिक अबलंबून आहेत.
🔎 'दाऊदच्या हस्तकांकडून पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट' :
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखण्यात आला आहे, अशी माहिती देणारे ऑडिओ मेसेज एका अज्ञाताकडून मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर आल्याची माहिती मिळाली. या धक्कादायक मेसेजनंतर पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
🚨 रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली; आरोपी आफताबची कबुली :
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला यानं कोर्टासमोर आपला कबुलीनामा दिला आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबनं कोर्टात कबुल केलं आहे. दरम्यान, आरोपी आफताबची पोलीस कोठडी आज संपल्यामुळे त्याला दिल्लीतील साकेत कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी आफताबनं दिल्लीतील साकेत कोर्टात कबुली दिली. आफताबच्या पोलीस कोठडीच चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
💁♂️ दापोलीतील साई रिसॉर्टवर आज हातोडा नाहीच :
दापोली येथील वादग्रस्त साई रिसॉर्टचे तोडकाम आज होणार नाही. साई रिसॉर्ट तोडकामाबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. त्यावेळी तोडकामाबाबत उच्च न्यायालय आदेश देण्याची शक्यता आहे. रिसॉर्टचे तोडकाम आज होणार असल्याने भाजप नेते किरीट सोमय्या हे दापोलीत दाखल झाले होते.
💭 ट्विटरवरील ब्लू टिकचा रंग बदलणार? :
ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरवरील ब्लू टिकचा रंग बदलण्याचा विचारात आहेत. मस्क यांनी नवीन ट्विट करत माहिती दिली आहे की, ट्विटरवरील ब्लू टिक सबस्क्रिप्शिनची सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय सध्या थांबवण्यात आला आहे. बनावट खात्यांना आळा घालण्यासाठी काही ठोस उपाययोजना नाही, तोपर्यंत हा निर्णय लांबवण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment