ग्रामीण विकासात पत्रकारांची भूमिका महत्वाची-श्रीपाद नांदेडकर




ग्रामीण विकासात पत्रकारांची भूमिका महत्वाची-श्रीपाद नांदेडकर


धुळे । समाज घडविण्यात व विकासास पत्रकारांची भूमिका महत्वाची असते.पत्रकार हा जनतेचा अारसा असताे. ग्रामीण भागातील पत्रकारांनी जनतेचे प्रश्न, समस्या साेडविण्यासाठी प्रयत्न करावे ,त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासात पत्रकाराची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन माजी माहिती उपसंचालक तथा राजवाडे मंडळाचे क्युरेटर श्रीपाद नांदेडकर यांनी केले.

    धुळे तालुका मराठी पत्रकार संघातर्फे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त संघाच्या कार्यालयात कार्यक्रम घेण्यात अाला. त्यांच्या अध्यक्षस्थानी श्रीपाद नांदेडकर हाेते. याप्रसंगी अखिल राज्य मराठी परिषदेच्या उत्तर महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार गाे.पी.लांडगे अाणि भारतीय पर्यावरण संस्थेच्या नाशिक विभागाच्या उपाध्यक्षपदी साेनगीरचे पत्रकार सतिष भावसार, गाेकुळ देवरे यांची निवड झाल्याबद्दल याप्रसंगी तालुका पत्रकार संघातर्फे विशेष सत्कार करण्यात अाला. कार्यक्रमाला व्यासपीठावर डाॅ.गिरासे, पत्रकार संघाचे अध्यक्ष राेहिदास हाके, उमाकांत पाटील व्यासपीठावर उपस्थित हाेते. याप्रसंगी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करतांना श्रीपाद नांदेडकर म्हणाले की, ग्रामीण भागात काम करतांना पत्रकारांना माेेठे अाव्हान असते. मात्र ग्रामीण जनतेच्या समस्या त्यांनी अापल्या वृत्तपत्रातून मांडून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. याप्रसंगी त्यांन राष्ट्रीय पत्रकार दिन व मराठी पत्रकार दिन का साजरा केला जाताे यासंदर्भातील व पत्रकारिता करतांना कशी केली पाहिजे यासंदर्भात अनुभव सांगून मार्गदर्शन केले. याप्रसंगी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त तालुका पत्रकार संघातर्फे उपस्थित सर्व पत्रकारांचा श्रीपाद नांदेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष राेहिदास हाके यांनी केले. सुत्रसंचालक उमाकांत पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सचिव रामकृष्ण पाटील यांनी केले. याप्रसंगी तालुक्यातील. भास्कर माळी .प्रशांत पाकळे . पि.एन. पाटील .विजय माळी . निलेश भंडारी .गोरख पाटील. जिजाबराव माळी .संतोष बागुल . शिवाजी पाटील . मधुकर सुर्यवंशी. नाना पगारे .. आदि...पत्रकार उपस्थित हाेते. मा . संपादक सो. सदर बातमी आपल्या दैनिकात प्रसिध्दी करावी ही विनंती  आपला . अध्यक्ष रोहिदास हाके

Post a Comment

Previous Post Next Post