Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    सकाळच्या टॉप घडामोडी





     ठोक महागाई 21 महिन्यांच्या नीचांकावर: नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई 5.85%, भाज्या आणि खाद्यपदार्थ झाले स्वस्त


    ▪️ बर्नार्ड अरनॉल्ट आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती: ट्विटरचे मालक मस्क यांना टाकले मागे; तिसऱ्या स्थानावर भारताचे अदानी


    ▪️ बँक ग्राहकांनो व्हा सावध!: निष्क्रिय खात्यांचे KYC अपडेट करून चोरी, 1.29 कोटी रुपये विविध बँकांत ट्रान्सफर; 4 जणांवर FIR


    ▪️ दारुबंदीवरुन नितीश कुमार आणि भाजप आमदारांमध्ये खडाजंगी: मुख्यमंत्र्यांचा संयम सुटला, विधानसभेत भाजप आमदारांना म्हणाले- गप्प राहा!


    ▪️ न्यूझीलंडमध्ये धूम्रपान बंदी कायदा मंजूर: 2008 नंतर जन्मलेली मुले कधीही तंबाखू-सिगारेट खरेदी करू शकणार नाहीत, 26 हजार कोटींची बचत होणार


    ▪️ महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर दिल्लीत बैठक: अमित शहा म्हणाले - सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्यांनी एकमेकांवर दावा करू नये


    ▪️ आमचा लढा सुरूच राहणार: प्रश्न सुप्रीम कोर्टात असताना बेळगावात अधिवेशन कसे घेता? उपराजधानी कशी करू शकता? - संजय राऊत


    ▪️ वादग्रस्त वक्तव्यावर सुषमा अंधारेंनी मागितली माफी: आळंदीत वारकऱ्यांनी काढली होती प्रतीकात्मक अंत्ययात्रा!


    ▪️ मुंबईत कर्नाटक सरकारची जाहिरात: बेस्टलाच पूर्णपणे रंगवले; असे बघितल्यावर नक्कीच खंत वाटते, रोहित पवारांचे ट्विट


    ▪️ 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम'वरून वाद शिगेला: लक्ष्मीकांत देशमुख यांचा भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, लेखकांची निषेध मोहीम


    ▪️ अर्जुन तेंडुलकरची वडील सचिनसारखी कमाल: रणजी पदार्पणातच ठोकले शतक, सचिनने 34 वर्षांपूर्वी केला होता पराक्रम


    ▪️ श्रेयस अय्यर शतकाच्या जवळ: भारताने बांगलादेशविरुद्ध पहिल्या दिवशी केल्या 6 बाद 278 धावा, पुजारा 90 धावांवर बाद


    ▪️ राज कुंद्रा, शर्लिन चोप्रा, पूनम पांडेला दिलासा: पोर्नोग्राफी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर, तपासात सहकार्य करण्याचे कोर्टाचे निर्देश


    ▪️ कॉपी आहे पठाणचे 'बेशरम रंग' गाणे!: फ्रेंच गाण्याशी मिळतेजुळते आहे बॅकग्राउंड बीट, सोशल मीडियावर होत आहे ट्रोल


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad