दिवसभरातील ताज्या घडामोडी

www.latursaptrangnews.com
By -
0



🗣️ महाविकास आघाडीत समन्वय नाही... :


महाराष्ट्रात सत्तेत असताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जो समन्वय होता, तो आता दिसत नाही, अशी स्पष्ट कबुली शनिवारी खासदार संजय राऊत यांनी दिली. ते मुंबईत बोलत होते. अमरावतीमध्ये काँग्रेसने ठाकरे सेनेच्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. ही जागा आम्ही जोरात लढलो असतो, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. दरम्यान, नाशिकमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय मातोश्रीवरच्या बैठकीत होणार असल्याचे ते म्हणाले.


😎 भाजपच्या शुभांगी पाटील मातोश्रीवर दाखल :


भाजपच्या नेत्या शुभांगी पाटील या मातोश्रीवर दाखल झाल्या आहेत. शुभांगी पाटील यांनी देखील नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरलेला आहे. त्यांना भाजपाचा अधिकृत पाठिंबा मिळेल, अशी शक्यता होती. मात्र भाजपा काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांच्याबाजूला झुकत असल्याचे दिसत शुभांगी पाटील यांनी मातोश्री गाठून ठाकरे गटाचा पाठिंबा मिळतो का? याची चाचपणी सुरु केली आहे.


🏠 मोठी बातमी! मुंबईमध्ये घराचं स्वप्न पूर्ण होणार :


म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 4 हजार 721 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात ही सोडत जाहीर होईल अशी शक्यता आहे.  म्हाडामध्ये ठाणे, विरारमध्ये नव्या घरांची भर पडली आहे. त्यामुळे लवकरच म्हाडाटच्या कोकण मंडळाकडून या सदनिकांसाठी सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे.


🏥 ललित मोदी आठवड्यापासून ऑक्सिजन सपोर्टवर :


आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांचा कोरोना झाला आहे. त्यानंतर आता माच्या सात दिवसांपासून ते २४ तास ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. ललित मोदी यांनी यासंदर्भातली एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ललित मोदी यांनी म्हटलं आहे की त्यांना दोन आठवड्यात दोनवेळा कोरोनाची बाधा झाली. तसंच निमोनियानेही मला ग्रासलं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.


💐 भारत जोडो यात्रेत काँग्रेस खासदाराचा मृत्यू :


पंजाबमध्ये सुरू असलेल्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान जालंधरचे काँग्रेसचे खासदार संतोखसिंह चौधरी यांचे निधन झाले. ते राहुल गांधी यांच्यासमवेत यात्रेत चालत होते.दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तात्काळ फगवाडा येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली, असे डॉक्टरांनी सांगितले. तर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default