Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत घोषणाबाजी, व्हिडिओ व्हायरल; ८ जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक


    औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत घोषणाबाजी, व्हिडिओ व्हायरल; ८ जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

     वाशिम : मंगरुळपीर शहरात दादा हयात कलदंर यांच्या उरूस निमित्त संदल मिरवणूक काढण्यात आली होती. या रॅलीत औरंगजेबाचे फोटो घेऊन तरुण नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे मंगरुळपीर शहरात तणावाचे वातवरण आहे.


    मंगरुळपीरमध्ये दादा हयात कलदंर यांच्या उरूस दरम्यान काही तरुण औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचले. यावेळी औरंगजेबाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. काही तरुणांच्या हाती दादा हयात कलंदर यांच्या उरुसमध्ये औरंगजेबाचा फोटो दिसला. ही घटना १४ जानवेरीच्या रात्री घडली. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती मंगरुळपीरच्या पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad