Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    लातूर काळे बोरगांव नजीक एसटी बस चा अपघात 40 गंभीर....



     एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटला, भीषण अपघात; रक्तबंबाळ अन् विव्हळणाऱ्या प्रवाशांचा मदतीसाठी धावा



    ग्रामस्थांकडून मदतकार्य

    अपघाताची माहिती मिळताच बोरगाव काळे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. मुरुड पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.



    बसचा चक्काचूर


    लातूरहून पुणे वल्लभनगरच्या दिशेने निघालेली एस. टी. बस लातूर तालुक्यातील बोरगाव काळे गावाजवळील पुलावर पोहोचताच बसचा स्टेअरिंग रॉड तुटला आणि बस पुलावरुन खाली घसली. या अपघातात बसमधील ३५ प्रवासी जखमी झाले. बस चालकाच्या डोक्याला जबर दुखापत झाली.

    मंगळवार दि. १७ जानेवारी रोजी सकाळी लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकातून एमएच २० बीएल २३७२ या क्रमांकाची बस पुणे वल्लभनगरला निघाली. ही बस बोरगाव काळे गावाजवळील पुलाजवळ सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास पोहोचली. बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटला आणि बस पुलावरुन रस्त्याच्याखाली घसरली. बसचा पुढील भाग पुलाखालील मातीच्या ढिगा-यावर धडकला आणि बस थांबली. या अपघातात बसमधील ३५ प्रवासी जखमी झाले. बस चालकाच्या डोक्याला जबर मार लागला. प्रत्यक्षदर्शनीने तात्काळ १०८ रुग्णवाहिलेला कळवले.

    रुग्णवाहिला घटनास्थळी आली आणि जखमी प्रवाशांना मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी ३५ प्रवाशांपैकी १६ जणांवर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचरासाठी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला पाठविण्यात आले आहे. या अपघातात सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. या अपघातामुळे लातूर-बार्शी महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. लातूरचे वाहतूक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.





    बस पुलावरून खाली कोसळताच बसचा पुढील भाग चक्काचूर झाला. प्रवासी गंभीर जखमी झाले असून यात लहान मुलांसह जेष्ठ नागरिकांचाही समावेश आहे.

     


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad