Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    गौरा फॅशन क्लब प्रजेन्ट्स " सेलेस्टीयल ब्युटी अँड हेरॉईक मॅन ऑफ द ग्रेट भारत 2023 ( सिझन-4) "

     गौरा फॅशन क्लब प्रजेन्ट्स

    " सेलेस्टीयल ब्युटी अँड हेरॉईक मॅन ऑफ द ग्रेट भारत 2023 ( सिझन-4) " 



    मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील श्री आरेफअली कोतवाल यांनी "मिस्टर कॅटेगरी" मध्ये विजेतेपद पटकावले. 

    या नॅशनल लेव्हलच्या सोंदर्य स्पर्धेचा सोहळा सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे मोठ्या दिमाखतीत 9 जानेवारी 2023 रोजी संपन्न झाला. 


    या स्पर्धेचे वैशिठय म्हणजे , ही स्पर्धा मॉडेलिंग, ब्युटी जगात करियर करणाऱ्या व आपले कौशल्य आजमवणाऱ्या स्पर्धकांसाठी आयोजित केली जाते.  या स्पर्धेचे ग्रुमिंग आयोजन हे श्रीमती गौरी नाईक व पॅजंट कोच चैतन्य गोखले यांच्याकडून घेण्यात आले व ग्रँड फिनालेचा सोहळा 9 जानेवारी रोजी कोल्हापूर येथे संपन्न झाला. या स्पर्धेसाठी संपुर्ण भारतातुन 300 ऑडिशन घेण्यात आले व त्यापैकी अंतिम फेरीसाठी 36 स्पर्धकांची निवड करण्यात आली. 

    तसेच महाराष्ट्रातून उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असलेले श्री आरेफअली कोतवाल यांनी 'मिस्टर कॅटेगरी" मध्ये विजेतेपद पटकावले आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.  विशेष म्हणजे श्री आरेफअली कोतवाल यांना या मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या मनोबळावर मॉडेलिंग क्षेत्रात कुठलेही पार्श्वभूमी नसतांना त्यांनी या स्पर्धेसाठी ग्रामीण भागातून राष्ट्रीय पातळीवर अतिशय मोलाची कामगिरी केलेली आहे.  व महाराष्ट्रासह उस्मानाबाद जिल्ह्याची शान आपल्या कला कौशल्याने पुन्हा वाढवलेली आहे.  तसेच याअगोदर त्यांनी हैद्राबाद येथील स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते व आत्ताच काही महिन्यांपूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाराष्ट्र युथ कार्णीवल या स्पर्धेतही त्यांनी मॉडेलिंग या स्पर्धेमध्ये अव्वल येण्याचा मान मिळवत त्यांना महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय श्री जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व धनादेश त्यांना देण्यात आलेला होता.  अशा या ग्रामीण भागातून श्री आरेफअली कोतवाल यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर उस्मानाबाद जिल्ह्याला या पूर्वी कित्येकदा मॉडेलिंग स्पर्धेमध्ये विजेतेपदाचा मान मिळवुन दिला आहे.  आरेफअली हे श्री रफतअली कोतवाल  (निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभाग उस्मानाबाद) यांचे चिरंजीव आहेत. 


     या स्पर्धेसाठी श्री रजनीश दुग्गल (मि. इंटरनॅशनल, ग्रासीम मि. इंडिया 2003),  मिलिंद गुणाजी (अभिनेता व मॉडेल),  डॉ. श्रध्दा जवानजाल (प्रेसिडन्ट, सहारा नर्सिंग एज्युकेशन),  श्रीमती गौरा नाईक (फाऊंडर डायरेक्ट, गौरा फॅशन क्लब) यांनी परीक्षकांचे काम पाहिले तर श्री भारत सुरती (जेड ब्लू) यांनी मेन्स लाईफ स्टाईल पार्टनर म्हणुन सहकार्य केले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad