दिवसभरातील ताज्या घडामोडी
🗣️ निलंबनानंतर सुधीर तांबेंची पहिली प्रतिक्रिया :
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी देऊनही अर्ज दाखल न केल्यावरून काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. झालेल्या प्रकारानंतर पक्षश्रेष्ठींशी बोलल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता काँग्रेसचे नेते डॉ. सुधीर तांबे यांनी त्यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी आपण लहानपणापासून काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता असल्याचं सांगितलं.
🤓 अजित पवार थोडक्यात बचावले, सांगितला किस्सा... :
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या लिफ्टला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. परमेश्वराच्या कृपेने मी वाचलो. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट धाडकन खाली आली होती. अन्यथा आज श्रद्धांजली वाहायचा कार्यक्रम घ्यावा लागला असता, अशी मिश्कील टिप्पणी करत अजित पवार यांनी आपल्या अपघाताची माहिती दिली. बारामती येथील उद्घाटन प्रसंगावेळी ही घटना घडली.
💁♂️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसमध्ये :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1 वाजता महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. हे सुसज्ज आणि आकर्षक पॅव्हेलियन दावोस येथे प्रमुख ठिकाणी आणि भारताच्या पॅव्हेलियनसमोरच आहे. त्यानंतर काही महत्वाच्या उद्योगांसमवेत सामंजस्य करार केले जातील.
⚡ राऊतांचे शिंदेंना आव्हान; म्हणाले... :
दावोसमधून काय येतय ते माहित नाही. पण तुमच्या नाकाखालून अनेक उद्योग गेले. त्यामुळे दावोसला जाण्याआधी गुजरातला जा. तुमच्या नाकाखालून गेलेले प्रकल्प परत आणा, असे खुले आव्हान शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
😊 बजेटपूर्वी निर्मला सीतारामन यांचे आश्वासक उद्गार :
महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला यंदाच्या अर्थसंकल्पात दिलासा मिळाण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुचक विधान केलं आहे. मी स्वत: मध्यमवर्गीय असून मध्यमवर्गीयांना होणाऱ्या त्रासाची मला कल्पना आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘पांचजन्य’ या मासिकेला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्या बोलत होत्या.
No comments