Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    मराठवाडा शिक्षक मतदारसंघ: राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळेंना धक्का, विश्वासू सहकारी भाजपात

     




    मराठवाडा शिक्षक मतदारसंघ: राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळेंना धक्का, विश्वासू सहकारी भाजपात



    परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आमदार विक्रम काळे यांना परभणीमध्ये धक्का बसला आहे. परभणीत त्यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे सहकारी आणि जुटा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष भारतीय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये गंगाखेड येथे पार पडला आहे. ऐन निवडणुकीमध्ये विक्रम काळे यांच्या निकटवर्तीयाने साथ सोडली असल्याने त्यांच्यासाठी हा मोठा हादरा मानला जात आहे.

    ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष भारतीय मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. अशातच मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडत असतानाच त्यांनी विक्रम काळे यांची साथ सोडली आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीमध्येच विक्रम काळे यांचे टेन्शन वाढणार आहे.

    हा प्रवेश भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये गंगाखेड येथे पार पडला आहे. यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य संतोष मुरकुटे, जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, विठ्ठलाराव रबदडे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

    एकीकडे सोळंके यांनी विक्रम काळे यांच्या उमेदवारीला विरोध करत अर्ज भरला असल्याने याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे. त्यातच परभणीमध्ये देखील विक्रम काळेंचे विश्वासू समजले जाणारे सुभाष भारतीय साथ सोडत भाजपच्या गोटात सामील झाले असल्याने या ठिकाणी मताची विभागणी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर येणाऱ्या काळामध्ये भाजपाचे मोठे नेते देखील मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने परभणीचा दौरा करणार आहेत.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad