Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    संत ज्ञानेश्वर महाविद्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथ आणि कोश प्रदर्शन संपन्न



     संत ज्ञानेश्वर महाविद्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथ आणि कोश प्रदर्शन संपन्न

    सोयगाव  ( प्रतिनिधी, यासीन बेग)

     दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त, मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांनी संयुक्तपणे ग्रंथ आणि कोश प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. शिरीष पवार यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले," कोश आणि ग्रंथ प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना त्याची अधिक चांगली ओळख होते. त्यामुळे आपण नेहमी ग्रंथ प्रदर्शन भरवतो. विद्यार्थ्यांनी या निमित्ताने विश्वकोश, संस्कृती कोश, इतर कोश, या परिसरातील साहित्यिकांचे ग्रंथ आणि अनेक दुर्मिळ ग्रंथ यांचे वाचन केलं पाहिजे. आपल्या महाविद्यालयामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही संपदा आहे त्याचा लाभ घेतला पाहिजे." यावेळी प्रा. डॉ. दिलीप बिरुटे (मराठी विभाग प्रमुख),  निर्मला बोराडे (ग्रंथपाल), प्रा. ज्योती स्वामी यांनी प्रदर्शनातील ग्रंथ आणि कोशांचे महत्त्व सांगून, कोश कसे वाचावे, त्यातील माहितीचा उपयोग कसा करावा याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रा. डॉ. रमेश औताडे ,डॉ. गोल्हारे, डॉ. पी. एन. डाबके, प्रा. श्रीकृष्ण परिहार, प्रा. डॉ चौधरे, प्रा. डॉ. भगत, डॉ. गावित ,एस. एफ. तडवी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad