Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    कॉपी गर्ल म्हणून शिक्षकाकडून भर वर्गात उल्लेख अन् विद्यार्थिनीचा धक्कादायक निर्णय

     


    कॉपी गर्ल म्हणून शिक्षकाकडून भर वर्गात उल्लेख अन् विद्यार्थिनीचा धक्कादायक निर्णय



    लातूर: शिक्षकाने कॉपी गर्ल म्हणून भर वर्गात उल्लेख केल्याने अपमानाची भावना निर्माण होऊन एका शाळकरी अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक सुसाईड नोटही लिहिली आहे.

    लातूर शहरातील औसा रोडवर असणाऱ्या एका शाळेत ही विद्यार्थिनी नववीच्या वर्गात शिकत होती. सध्या सीबीएससीच्या दुसऱ्या सत्राच्या परिक्षा सुरू आहेत. दरम्यान १७ जानेवारीला ही विद्यार्थिनी परीक्षा देत असताना कॉपी करताना पकडली गेली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी तिचा भर वर्गात कॉपी गर्ल म्हणून उल्लेख केला.

    त्यामुळे या विद्यार्थिनीच्या मनामध्ये अपराधीपणाची आणि त्यासोबतच अपमानाची भावना निर्माण झाली. ही अपमानकारक भावना मनात घेऊन तिने सुसाईड नोट लिहीत जगाचा निरोप घेतला. तिने १८ जानेवारी रोजी सायंकाळी राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील चौकशी करीत आहेत.

    शिक्षणाची पंढरी असणाऱ्या लातूर शहरात परवाच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असताना आता एका शाळकरी अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रासह शहरात एकच खळबळ उडाली आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad