Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    जळीतग्रस्तांसाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्याकडून गृहसंसार उपयोगी वस्तूंची भेट



     जळीतग्रस्तांसाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्याकडून गृहसंसार उपयोगी वस्तूंची भेट


       नांदगाव तालुक्यातील दोन कुटुंबियांच्या झोपडीस आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या कुटुंबियांना आमदार सुहास आण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते गृह उपयोगी संसार भांडे कपडे अन्नधान्य भेट देण्यात आले. 

       नांदगाव तालुक्यातील पिंपरी हवेली येथील ऊसतोड कामगार विलास श्रावण सोनवणे, सौ. सखुबाई विलास सोनवणे, यांच्या झोपडीला आग लागून सर्व संसार खात झाला तसेच पळाशी येथील साहेबराव भावडू गायकवाड मोठ्या प्रमाणात संसाराची हानी झाली. दोन्ही कुटुंबांना आज आमदार निवास बोलावून त्यांना कपडे गॅस शेगडी संसार उपयोगी भांडे गहू तांदूळ देण्यात आले.

          याप्रसंगी जिल्हाप्रमुख किरणभाऊ देवरे, प्रमोदभाऊ भाबड, विलासभाऊ आहेर, जीवन गरुड, राहुल वाघ अनिल पवार, प्रकाश आव्हाड, रंगनाथ आव्हाड, सौ.रोहिणी मोरे, सौ.संगीता अनिल पवार, सौ. निराली राहुल वाघ, आदि उपस्थित होते.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad