: "शाहरुख खान मुस्लिम नाही, त्याला मारून टाका, पण..."
सध्या सुरू असलेल्या पठाण विवादादरम्यान रझा अकादमीचे मौलवी खलील-उर-रहमान यांनी 'शाहरुख खान मुस्लिम नाही, जा आणि त्याला मारून टाका' असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेला जर चित्रपटाचा विरोध करायचा असले तर त्यांनी शाहरुखच्या घरी जावे आणि त्याला गोळी मारावी, असे मौलवी खलील-उर-रहमान म्हणाले.
"मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बजरंग दलाने पठाणला विरोध केला होता. यावेळी काही लोकांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. यानंतरच इंदूरमधील बडवाली चौकी आणि खजराना पोलीस स्टेशनच्या बाहेर इस्लामी समुदाय जमा झाला. त्यांनी घोषणा दिल्या. आम्ही पुन्हा सांगत आहोत, पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द खपवून घेतले जाणार नाहीत", असे मौलवी खलील-उर-रहमान यांनी सांगितले.