विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रातून वाहतूक सुरक्षेची जनजागृती

www.latursaptrangnews.com
By -
0

 विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रातून वाहतूक सुरक्षेची जनजागृती 


रोटरी मिडटाऊनचा

 
अभिनव उपक्रम 

    लातूर/प्रतिनिधी:वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे फलक बनवून त्या माध्यमातून वाहतूक सुरक्षे विषयी जनजागृती करण्याचा उपक्रम रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने राबविण्यात आला.या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
     रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊच्या वतीने वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. 'वाहतूक सुरक्षा- माझी जबाबदारी ' हा विषय चित्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आला.विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांमधून १० चित्रांची निवड क्लबच्या वतीने करण्यात आली. या चित्रांचे प्रत्येकी दोन फलक बनवून अधिक रहदारी असणाऱ्या शहरातील २० चौकामध्ये लावण्यात आले आहेत.वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला.चित्रांच्या फलकावर क्लबचे नाव,विद्यार्थ्यांचा वर्ग व शाळेच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.या फलकांची माहिती संबंधित विद्यार्थी व शाळेला देण्यात येणार आहे.
      शालेय स्तरापासूनच वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाच्या आयोजनामाचा हेतू आहे.पोलीस निरीक्षक बिर्ला यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांचा सत्कारही यावेळी क्लबच्या वतीने केला गेला.
    यावेळी रोटरीचे पदाधिकारी वीरेंद्र फुंडीपल्ले,अमोल दाडगे, श्रीनिवास भंडे,मोतीलाल वर्मा, श्रवण बियाणी,अजय दुडीले, सुधीर लातूरे,पर्वत नागुरे, विष्णुदास तोष्णीवाल,पवन मालपाणी यांच्यासह पोलिस अंमलदार रामदास मद्देवाड, बाळासाहेब केंद्रे,सतिश सांगेवाड, अनुराधा डोंगरे व अर्चना मठपती आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default