Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा




    🔎 हसन मुश्रीफांच्या घरी ईडीकडून छापेमारी :


    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने छापेमारी केली. पुणे आणि कागल येथील घरांवर ईडीने छापा टाकला आहे. छापेमारीचं वृत्त समोर येताच हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली असून ईडीविरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे. साखर कारखान्यात आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी ईडीकडून ही कारवाई केली जात आहे.


    🗣️ अपघातानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया :


    अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांना रस्ता ओलांडताना दुचाकीने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात बच्चू कडू गंभीर जखमी झाले. यानंतर बच्चू कडूंनी ट्वीट केलं आणि अपघाताची माहिती देत पहिली प्रतिक्रिया दिली. बच्चू कडू म्हणाले, आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये.


    😎 किरीट सोमय्यांनी काढले 4 घोटाळे :


    माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोट्यवधींचे बेनामी पैसे बंद पडलेल्या कंपन्यांमधून आपल्या खात्यात वळवले. जावयाला 1500 कोटींचे कंत्राट दिले. मात्र, आता ते विशिष्ट लोकांच्या धर्माला टार्गेट केले म्हणत आहेत. गरीब शेतकऱ्यांना लुटताना त्यांना धर्म आठवला नाही का, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.


    🏏 पृथ्वी शॉची विक्रमी धावसंख्या :


    भारताचा युवा सलीमीवीर पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीमध्ये एक धमाकेदार खेळी करत अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. एलायट ग्रुप-बीच्या मुंबई विरुद्ध आसाम सामन्यात त्याने तब्बल 379 धावा केल्या. मुंबईकडून खेळताना त्याने आसामविरुद्ध ही विक्रमी धावसंख्या केली. विशेष म्हणजे रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.


    💐 ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन :


    आपल्या अभिनयानं मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ मुलुंड येथील सरला नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad