Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    Raj Thackeray : राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी; काय आहे प्रकरण?

     


    Raj Thackeray : राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी; काय आहे प्रकरण?


    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे. राज ठाकरे यांच्यावर चिथावणी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हे वॉरंट रद्द करण्यासाठी राज ठाकरे हे आज परळी कोर्टात राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. ज ठाकरे यांचं अटक वॉरंट रद्द होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर काय आहे प्रकरण जाणून घेऊ. (Raj Thackeray appear in parli court what is the matter)

    काय आहे प्रकरण?

    2008 मध्ये राज ठाकरेंना एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. त्या अटकेचे पडसाद परळीतही उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणि चिथावणीखोर वक्तव्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता.


    राज ठाकरे यांना परळी कोर्टाचे समन्स: 12 जानेवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश


    पोलिसांनी चार्शीट फाईल केल्यानंतर राज ठाकरे न्यायालयात तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आधी 3 जानेवारी आणि नंतर 12 जानेवारीला राज ठाकरेंना परळी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. पण, 12 तारखेला राष्ट्रमाता जिजाऊ जयंती होती, त्यामुळे न्यायालयाने तारीख वाढवून दिली आहे. त्यानुसार, आज ते कोर्टात हजर होत आहेत.

    दोन वेळा वॉरंट जारी

    याआधी राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी या सुनावणीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांना गेल्या वर्षी 6 जानेवारी 2022 रोजी अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. त्यानंतर 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत परळी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले.


    मात्र, याविरोधात संजय आघाव, शिवदास बिडगर, अनीस बेग, प्रल्हाद सुरवसे, राम लटपटे यांनी कोर्टात धाव घेऊन अजामीनपात्र वॉरंट रद्द केले होते. त्यानंतर राज यांना 13 एप्रिल रोजी दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad