Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    दिवसभरातील ताज्या घडामोडी



    📣 सत्यजित तांबे कॉंग्रेसमधून निलंबित, नाना पटोलेंची घोषणा :


    सत्यजित तांबे यांचं काँग्रेसमधून निलंबन केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. सत्यजित तांबे यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसनं डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.


    🔎 कसबा पेठ पोटनिवडणुकीवरुन मविआत नवा तिढा :


    भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 27 फेब्रुवारीला मतदान होणार असून 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र या जागेवरून संघर्ष होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.


    😎 पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी मुंबईत जोरदार बॅनरबाजी :


    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत विविध विकास कामांचे भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी शिवसेना-भाजप-शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुंबईतील गिरगाव आणि मरीन लाइन्स येथे बाळासाहेबांपुढे मोदींची मान झुकते, या आशयाचे बॅनर्स लावण्यात आले आहे.


    🗣️ खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप :


    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दावोसचा दौरा केला आणि आणि राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याचे सांगितले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या कंपन्यांसोबत चर्चा केली ते उद्योजक परदेशातील नव्हे तर हैदराबादचे आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे.


    🚨 अभिनेत्री राखी सावंतला अटक :


    अभिनेत्री राखी सावंतला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. राखीला आज दुपारी 3 वाजता तिची डान्स अकादमी सुरू करणार होती, यात तिचा पती आदिल खान दुर्राणी तिचा पार्टनर आहे. मॉडेल, अभिनेत्री शर्लिन चोप्राने गतवर्षी दाखल केलेल्या पोलीस तक्रारीवरून राखी सावंतला अटक करण्यात आली.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad