मराठा आरक्षणासाठी भिसे वाघोली येथे साखळी उपोषण

www.latursaptrangnews.com
By -
0

latur


 मराठा आरक्षणासाठी भिसे वाघोली येथे साखळी उपोषण

    लातूर तालुका प्रतिनिधी नवनाथ शिंदे:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लातूर तालुक्यातील  भिसे वाघोली येथे गेली दोन  दिवसापासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे.मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात भेटी घेत आहेत.आपल्या पुढील पिढीला आरक्षण भेटल पाहिजे यासाठी समस्त भिसे वाघोली गावकऱ्यांनी जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पने उभे राहण्याचे ठरवले. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषणाचा निर्धार गावकऱ्यांनी केला. या उपोषणाला इतर समाजाचाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. १४ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या अंतरवली सराटी येथील सभेला भिसे वाघोली मधून जवळपास २० वाहने निघणार आहेत.

         त्याचप्रमाणे भिसे वाघोली येथील समस्त मराठा बांधवांनी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव मंजूर केला.तसेच सर्वपक्षीय आमदार, खासदार यांना गावात बंदी असेही ठरवण्यात आले.


Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default