“राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती” व
“दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती” अर्ज करण्याचे आवाहन
§ 30 नोव्हेंबरपर्यंत नुतणीकरण नोंदणी करण्याची मुदत
लातूर, दि. 10 (जिमाका) : सन२०२३-२४ वर्षासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजनेसाठी (NMMSS) राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP २.० ) (www.scholarships.gov.in ) या संकेतस्थळावर नवीन आणि नूतनीकरण अर्जांच्या ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरण्यास १ ऑक्टोबर २०२३ पासून स्वीकारण्यास सुरुवात झाली असून या विद्यार्थ्यांनी दोन्ही योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नवीन व नुतणीकरण विद्यार्थ्यांसाठी 30 नोव्हेंबर, 2023 पर्यंत अंतिम मुदत असल्याचे शिक्षण संचालनालयाचे (योजना) शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी आवाहन केले आहे.
राज्यामध्ये पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती (NMMSS) परीक्षा शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये निवड झालेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी 2023-24 शैक्षणिक वर्षाची इयत्ता नववनीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन अर्जदार म्हणून आणि नववी , दहावी , अकरावी उत्तीर्ण झालेल्या शिष्यवृत्ती धारकांनी स्वतःची नोंदणी आधारनुसार करावी.
यापूर्वी शिष्यवृत्ती घेत असलेल्या विद्यार्थांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी दहावी, अकरावी आणि बारावीसाठी नूतनीकरण अर्जदार म्हणून स्वतःचे नूतनीकरण करावे लागेल.
तर केंद्र शासनाच्या अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग (DEPWD) मार्फतराष्ट्रीय शिष्यवृत्ती (NSP) पोर्टलद्वारे अपंग विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती (इयत्ता नववी आणि दहावी) लागू केली आहे. NSP २.० पोर्टलवर विद्यार्थ्यांची नोंदणी 1ऑक्टोबर2023 पासून सुरू झाली आहे.
या योजनचे तपशील या विभागाच्या वेबसाइटवर ( www.depwd.gov.in ) आणि राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल ( www.scholarships.gov.in ) वर उपलब्ध आहेत. नोंदणी आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख पोर्टल 30 नोव्हेंबर 2023 आहे.
No comments:
Post a Comment