Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    इस्रायल पॅलेस्टाईन युद्धामुळे भारताची डोकेदुखी वाढली, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत होणार वाढ?

     




    इस्रायल पॅलेस्टाईन युद्धामुळे भारताची डोकेदुखी वाढली, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत होणार वाढ?


    Petrol Diesel Rate: हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी गाझामधून इस्रायलवर रॉकेट डागल्यानंतर इस्रायल आणि गाझामध्ये आतापर्यंत 1,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. प्रत्युत्तर म्हणून इस्रायली संरक्षण दलांनी गाझामध्ये हल्ले सुरू केले.

    या हल्ल्यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली आहे. या युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतींवर झाला आहे. पश्चिम आशियात निर्माण झालेल्या या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमती एका झटक्यात 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत.


    पश्‍चिम आशियाचा प्रदेश संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जगाच्या कच्च्या तेलाच्या एक तृतीयांश गरजेचा पुरवठा याच भागातून केला जातो. हमासने शनिवारी सकाळी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियातील परिस्थिती पुन्हा अस्थिर झाली आहे. गेल्या 50 वर्षांतील इस्रायलच्या इतिहासातील हा सर्वात भयंकर हल्ला असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.\


    सध्या तरी युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत

    हमासच्या हल्ल्यात महिला, लहान मुले आणि वृद्धांसह हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांना ओलीस ठेवण्यात आले आहे. त्यानंतर इस्रायलने अधिकृतपणे युद्धाची घोषणा केली आहे. या युद्धाबाबत जगही दोन गटांमध्ये विभागलेले दिसते. सध्या युद्ध लवकर संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

    सध्या कच्च्या तेलाची किंमत काय आहे?

    ब्लूमबर्गच्या एका बातमीनुसार, पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत 5 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. रॉयटर्सच्या एका बातमीनुसार, ब्रेंट क्रूडमध्ये 4.18 डॉलर किंवा 4.99 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे आणि ती प्रति बॅरल 88.76 डॉलरवर पोहोचली आहे. याचा परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते.


    हमासने इस्रायलवर केलेला हल्ला इराणशी जोडला जात आहे. या हल्ल्यात इराणच्या गुप्तचरांचा थेट हात असल्याचा आरोप होत आहे. इस्रायलने या हल्ल्याचा आरोप इराणवर केला आहे. इस्रायलवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये मोठा जल्लोष करण्यात आला.

    इराणने या हल्ल्याबद्दल हमासचे कौतुकही केले आहे. आता अशा परिस्थितीत इराणचा पुरवठा पुन्हा बंद होण्याची भीती बाजारात आहे, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढू शकतात.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad