Header Ads

  • Breaking News

    3/ ताज्या बातम्या / slider-tag

    डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा



     डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा

    लातूर :-
    लातूर शहर विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई महायुतीच्या उमेदवार डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या व्यापारी मतदार भेटी-गाठी व संवाद पदयात्रा कार्यक्रम दि. 2 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 4.00 वा. होईल.

    या संवाद पदयात्रेला गंजगोलाई येथून श्री जगदंबा माता देवीची आरती करून पदयात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष  देवीदासजी काळे यांची उपस्थिती राहणार आहे. ही पदयात्रा गंजगोलाईतून  निघून छत्रपती शिवाजी महाराज रोड, नांदेड रोड मार्गे गूळ मार्केट, सराफ लाईन, हनुमान चौक येथे नारळ वाढउन कापड लाईन, भूसार लाईन, सुभाष चौक ते हत्ते काॅर्नर, मस्जिद रोड जाऊन पद यात्रेचा गंजगोलाईत समारोप होणार आहे.

    तरी सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपाई महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक गणेश गवारे, शिवसिंह सिसोदिया, अनिल पतंगे, आनंद कोरे यांनी केले आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad