रूग्णालयात महिलेचा मृत्यू; डॉक्टरावर हलगर्जीपणाचा आरोप

www.latursaptrangnews.com
By -
0



लातूर ः येथील छत्रपती शाहू महाराज चौकात असलेल्या एका प्रसूती व स्त्रीरोग रूग्णालयात एक 38 वर्शे वयाची महिला शस्त्रकि‘येसाठी गेली असता उपचारा दरम्यन त्या महिलेचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेनंतर नातेवाईक संतप्त झाल्याचे दिसून आले. डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची ते मागणी करित होते. छत्रपती शाहू महाराज चौकात एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल आहे. उपलब्ध माहितीनुसार बुर्‍हाणनगर भागातील एक 38 वर्षे वयाची महिला गर्भाशाच्या आजारावर उपचारासाठी त्या रूग्णालयात दाखल झाली होती. दाखल होताच काही तासातच त्यांचा मृत्यू झाला. सदर दुर्घटना रूग्णाच्या नातेवाईकांना कळताच नातेवाईक संतप्त होऊन रूग्णालयासमोर एकत्र आले होते. डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी ते आक‘मक होते. मात्र, या प्रकरणी दुपारपर्यंत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)
3/related/default