🔎 श्रद्धा वालकर प्रकरणात मोठी अपडेट :
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी आफताब पुनावालाने जंगलात फेकलेल्या हाडांचा डीएनए हा श्रद्धा वालकरच्या वडिलांशी जुळला आहे. त्यामुळे आफताबने फेकलेली हाडे श्रद्धाची असल्याचे समोर आले आहे. फॉरेन्सिक अहवालात समोर आलेल्या या गोष्टीमुळे श्रद्धा हत्या प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
👍 मोर्चाला परवानगी द्यावीच लागेल... :
लोकशाहीत मार्गानं करण्यात येणाऱ्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नसल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. मोर्चाला परवानगी द्यावीच लागेल. कारण या देशात अजूनही लोकशाही आहे. हुकूमशाही नाही असेही राऊत म्हणाले. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या दैवतांचा अपमान करतात. सरकार त्याचं समर्थन करते. मग याविरोधात आम्ही मोर्चा काढायचा नाही का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.
🗣️ धर्मांध राजकारणावर उदयनराजे भोसले यांचा प्रहार :
छत्रपती शाहू महाराजांच्या 273 व्या स्मृतिदिनानिमित्त सातारमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. यावेळी बोलताना उदयनराजे यांनी धर्मांध राजकारणावर कडाडून प्रहार केला. उदयनराजे म्हणाले की, थोर पुरुष होते म्हणून आपण लोकशाहीत वावरतो आहे. ते नसते, तर आपण गुलामगिरीत असतो. परंतु, त्यांची बदनामी केली जाते त्याचे वाईट वाटते. थोर पुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्या विकृतीत वाढ झाली आहे.
⚡ अजित पवारांना मोठा दिलासा :
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाला सर्वोच्च न्यायालयाकडून जप्त केलेल्या मालमत्ता परत करण्याचा आदेश देण्यात आला आहे. अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासाठी दिलासादायक निर्णय आहे. आयकर विभागानं जरंडेश्वर साखर कारखान्यासह जमिनी तात्पुरत्या जप्त केली होती. आता ही मालमत्ता परत करण्याचे आदेश दिलेत.
🏏 मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्स होणार सहभागी :
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चषक उंचावलेला संघ असूनही आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने (MI) अत्यंत खराब कामगिरी केली. ज्यानंतर आता इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये पुन्ह जुन्या फॉर्मात परतण्याचा संघाचा प्रयत्न असेल. अशात संघातून बरेच दिग्गज खेळाडू वेगळे झाल्याने आता आगामी लिलावात मुंबई संघाला बऱ्याच स्टार खेळाडूंची गरज असेल. आगामी आयपीएलचा लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे दरम्यान मुंबई इंडियन्सलाही अनेक खेळाडू विकत घ्यावे लागणार असून काही खेळाडू असतील ज्यांना प्रत्येक संघ आपल्यामध्ये सहभागी करुन घ्यायला उत्सुक असेल.
No comments:
Post a Comment