Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर



    💁‍♂️ SBI कडून Home Loan च्या व्याजदरात वाढ

    देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेनं (SBI) गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात वाढ केल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे आणि यात आता स्टेट बँकेचाही समावेश झाला आहे. SBI च्या गृहकर्जाचे वाढलेले व्याजदर १५ डिसेंबर २०२२ पासून लागू झाले आहेत. बँकेने MCLR (MCLR), EBLR (EBLR) आणि RRLR (RRLR) म्हणजेच जवळपास सर्व प्रकारच्या कर्जाचे व्याजदर वाढवले ​​आहेत.

    😎 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' निवासस्थानी हालचाली

    चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला होता. त्या राजकीय भूकंपातून शिवसेनेचा ठाकरे गट सावरत असताना शिंदे गटाकडून धक्क्यावर धक्के सुरुच आहेत. नाशिकच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. या घडामोडी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानातून घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

    🚨 अरुण गवळी यांना संचित रजा मंजूर

    गॅंगस्टर अरुण गवळी यांना नागपूर खंडपीठाने संचित रजा मंजूर केली आहे. गवळी यांनी तुरुंग प्रशासनाकडे रजेचा अर्ज केला होता. परंतू जेल प्रशासनाने तो अर्ज नामंजूर केला होता. पण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना संचित रजा मंजूर केली आहे. ज्या कैद्याची तीन वर्षे प्रत्यक्ष सजा भोगून झाली आहे असे दोष सिंद्ध झालेला कैदी हे संचित रजेसाठी पात्र असतो.

    🛕 शिर्डी साईबाबा मंदिराला मिळणार उच्च दर्जाची सुरक्षा...

    साईबाबा मंदिर व परिसर, शिर्डी यांची सुरक्षा, केंद्रीय पोलिस राखीव दल, किंवा केंद्रीय औद्योगीक सुरक्षा दल यांच्या मार्फत देण्यासंदर्भात प्रधान जिल्हा न्यायाधिश तथा अध्यक्ष यांनी अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर व्ही घुगे व न्या. एस. ए देशमुख यांनी दिले.

    🚀 चीनला धडकी भरवणाऱ्या क्षेपणास्त्र अग्नी-5 ची यशस्वी चाचणी

    चिनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने सर्वात शक्तीशाली क्षेपणास्त्र अग्नी-5 ची यशस्वी चाचणी घेतली आहे. भारताने अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी घेतली असून अणुशक्तीच्या या क्षेपणास्त्राने 5 हजार किलोमीटर अंतरावर जाऊन आपले लक्ष्य यशस्वीपणे भेदले आहे. आता संपूर्ण आशिया, अर्धा युरोप, रशिया आणि युक्रेन तसेच राजधानी बीजिंगसह संपूर्ण चीन अग्नि-5 च्या कक्षेत आला असल्याची माहिती समोर आलीय.

    🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad