Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाचं? आज पुन्हा सुनावणी,

     


    धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाचं? आज पुन्हा सुनावणी,


    शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात मागच्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर कागदपत्रे व लेखी युक्तीवाद सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील काही दिवसांत यावर निर्णय दिला जाणे अपेक्षित आहे.

    सर्वोच्च न्यायालयात देखील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू असून पुढील सुनावणी ही येत्या १४ फेब्रुवारीला होणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय देण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला असल्याचे सांगितले होते.

    २० जानेवारी रोजी झालेल्या निवडणुक आयोगाच्या सुनावणीदरम्यान आयोगाने दोन्ही गटांना २३ जानेवारी पर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देष दिले होते. तसेच पुढील सुनीवणीसाठी ३० जानेवारी ही तारीख देण्यात आली.


    आतापर्यंत काय-काय घडलं

    25 ऑगस्ट - राज्यातील सत्तासंघर्षावर घटनापीठात ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षाकडून दावे करण्यात आले

    6 सप्टेंबर - संबंधित सर्व प्रकरणाची एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय झाला.

    27 सप्टेंबर - न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाचा अर्ज फेटाळत खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवला.

    4 ऑक्टोबर - धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदे पक्षाकडूव केंद्रीय निवडणूक आयोगात याचिका करण्यात आली.

    7 ऑक्टोबर - चिन्हावर हक्क सांगणारी कागदपत्रं दोन्ही पक्षांकडून सादर करण्यात आली

    8 ऑक्टोबर - दोन्ही पक्षांना धक्का देत निवडणूकीत शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह न वापरण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश

    11 ऑक्टोबर - अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे आणि शिंदे यांच्या दोन्ही पक्षांना स्वतंत्र निवडणूक चिन्ह देण्यात आले.

    9 डिसेंबर - ठाकरेंच्या पक्षाकडून 20 लाख सदस्यांचे प्रतिज्ञापत्र तर शिंदेंच्या पक्षाकडून 10.3 लाख सदस्यांचे फॉर्म, 1.8 लाख प्रतिज्ञापत्र सादर

    11 डिसेंबर - सर्वोच्च न्यायालयात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद

    10 जानेवारी- 14 फेब्रुवारीपासून सलग सुनावणी होणार

    20 जानेवारी - केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना २३ जानेवारीपर्यंत लेखी उत्तर देण्याचे आदेश.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad