ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख यांच्या हस्ते लातूर शहरातील पहिल्या जापनीज कोमाकी इलेक्ट्रिक कंपनीच्या अमु मोटर्स शोरूमचा शुभारंभ



 ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख यांच्या हस्ते लातूर शहरातील पहिल्या जापनीज कोमाकी इलेक्ट्रिक कंपनीच्या अमु  मोटर्स शोरूमचा शुभारंभ


लातूर प्रतिनिधी

लातूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य तथा ट्वेंटीवन शुगर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख यांच्या हस्ते शनिवार दिनांक २८ जानेवारी रोजी सायंकाळी लातूर शहरातील एमआयडीसी कॉर्नर बार्शी रोड येथील तोडकर कुटुंबियांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या लातूर शहरातील पहिल्या नामांकित जापनीज कोमाकी इलेक्ट्रिक कंपनीच्या अमु मोटर्स शोरूमचा शुभारंभ  करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक डी.एस.बी लातूरचे शिरसाठ,
 चंद्रकांत साळुंके,सतीश साळुंके,अविनाश चव्हाण, जगन मुदगडे,हरी लकडे, धनंजय शिंदे,अशोक राठोड,रवी गायकवाड,महेश रोही, पवन सोमवंशी,जयपाल राठोड,धीरज शिरुरकर,बाळासाहेब भारती,किशोर जंगले,संतोष मोरे, दिपक पाटील, परमेश्वर इंगळे,सचिन खोसे, दत्ता इंगळे, दत्ता काळे, रियाज सय्यद,प्रवीण मेटे सचिन टमके आदिसह तोडकर कुटुंबीय मित्र परिवार उपस्थित होते.

ट्वेंटीवन शुगर कारखान्याचे व्हा. चेअरमन विजय देशमुख म्हणाले की सध्याच्या वाढत्या प्रदूषणाच्या काळात प्रत्येक व्यक्तीने इलेक्ट्रिक बाईकचा वापर करून प्रदूषण कमी करण्यात हातभार लावावा सध्याच्या वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य माणसांना परवडेल अशा दरात नामांकित जापनीज कोमाकी कंपनीने इलेक्ट्रिकल बाईक विविध स्वरूपात उपलब्ध केल्या आहेत त्याचे पहिले शोरूम तोडकर कुटुंबियाने लातूर शहरात उभारले आहे याबद्दल तोडकर कुटूंबियांचे कौतुक करून त्यांनी पुढील व्यवसायासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post