(दिवसभरातील ताज्या घडामोडी
सत्यजीत तांबे यांची मतदानानंतरची प्रतिक्रिया :
लवकरच जे मागचे दहा पंधरा दिवसांमध्ये राजकारण झालं. ज्याच्यातून परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. मी तर अपक्ष उमेदवार आहे, अपक्षच राहील. याच्यापेक्षा जास्त कुठलेही राजकीय भाष्य आजच्या तारखेला करणार नसल्याचे वक्तव्य सत्यजीत तांबे यांनी केले आहे.
😎 सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांना फटकारले :
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच धारेवर धरले आहे. गृहमंत्रीपद सांभाळता येत नसेल, तर फडणवीसांनी आपल्या खात्याचा राजीनामा द्यावा, असे त्या स्पष्ट शब्दांत म्हणाल्यात.
💁♂️ पंतप्रधान मोदींचा 10 फेब्रुवारी रोजी मुंबई दौरा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबई दौरावर येणार आहेत. मुंबईच्या अंधेरी पूर्वमधील मरोळ बोहरा कॉलनीमध्ये बोहरा मुस्लीम समाजाकडून उभारण्यात आलेला अल जमिया तस सैफिया या विद्यापीठाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींचा 10 फेब्रुवारी मुंबई दौरा आहे. मुंबई पोलिसांकडून आजपासूनच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी देखील या ठिकाणी तब्बल चार तास पाहणी केली.
⚖️ बीबीसी डॉक्युमेंटरीवरील बंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान :
इंडिया द मोदी क्वेश्चन..ही बीबीसीची डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाल्यापासूनच भारतात वादात आहे. केंद्र सरकारनं ती युट्युबवरुन हटवली, ट्विटरवर कुणाला त्याबाबत प्रसारास बंदी करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून घालण्यात आलेल्या डॉक्युमेंटरीवरील बंदीचे प्रकरण आता थेट सुप्रीम कोर्टात पोहचले आहे. माहितीपटावरील बंदी उठवण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.
🔎 राहुल गांधींनी सांगितली मनातली वेदना :
भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा राहुल गांधी अवघे 21 वर्षांचे होते. आपल्याला त्यावेळी ही बातमी कशी समजली? ही वेदना आज राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या भाषणात बोलून दाखवली. पुलवामाच्या शहीद सैनिकांच्या मुलांच्या मनात काय वेदना झाल्या असतील तेव्हा काय वाटलं असेल ते मी समजू शकतो माझी बहिण समजू शकते. तो फोन आला तेव्हा मला काय वाटलं असेल हे इथे काश्मीरमधले लोक समजू शकतात. कारण त्यांच्याही घरांमध्ये असे फोन आले असतील.