माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते होणार लातूर बिल्ड एक्सपोचे उद्घाटन
लातूर/प्रतिनिधी:रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लातूर बिल्ड एक्स्पो २०२३ चे उद्घाटन देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते शुक्रवार दि.३ फेब्रुवारी रोजी सायं ५ वाजता होणार असल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष विरेंद्र फुंडीपल्ले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
वेगाने वाढत्या लातूर शहरातील बांधकाम क्षेत्रातील सर्व वस्तू व सेवांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध व्हावी,नागरिकांना आपले घराचे स्वप्न सत्यात उतरविणे सोपे व्हावे,यासाठी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.दिनांक ३ ते ६ फेब्रुवारी दरम्यान टाऊन हॉलच्या मैदानावर हा एक्सपो संपन्न होणार आहे.या करीता लातूर शहरात प्रथमच Greman Hanger चा वापर करण्यात येणार आहे.बांधकाम क्षेत्रातील सिमेंट,स्टील,फर्निचर यासह सोलर,होम ऑटोमेशन,लँडस्केप आदीपासून बांधकामासाठी स्वस्त लोन,आधुनिक नर्सरी,घरात लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू, दरवाजाचे विविध प्रकार,नवीन टेक्नॉलॉजी या संदर्भातील सर्व माहिती देणारे स्टॉल या एक्सपोमध्ये असणार आहेत. यासाठी नवीन तसेच नामवंत ब्रँड्सनी रोटरी क्लबकडे त्यासाठी नोंदणी केली आहे.
बिल्ड एक्सपो दरम्यान बांधकामाविषयी माहिती देणाऱ्या चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे.याशिवाय खवय्यांसाठी स्वतंत्र स्टॉल असणार आहेत.विद्यार्थ्यांसाठी स्पेस planetarium हे यावेळी विशेष आकर्षण असणार आहे. एक्सपो दरम्यान कवी संमेलनही होणार आहे.
सिव्हिल क्षेत्रातील सेवा आणि संधी या संदर्भात व्याख्यान होणार आहे.याशिवाय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरसाठी व व्यवसायात आगमन करताना घ्यावयाची काळजी या संदर्भात स्वतंत्र व्याख्याने होणार आहेत.मॅजिक शो हे या एक्सपोचे विशेष आकर्षण असणार आहे,अशी माहितीही फुंडीपल्ले यांनी दिली.
बांधकाम क्षेत्रातील सर्व सुविधांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा लातूर शहरातील हा पहिलाच प्रयत्न आहे.सुंदर व आधुनिक घराचे स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी या बिल्ड एक्सपोला भेट द्यावी तसेच उद्घाटन समारंभास उपस्थित रहावे,असे आवाहनही विरेंद्र फुंडीपल्ले यांनी केले आहे.यावेळी प्रोजेक्ट चेअरमन अनुप देवणीकर,रवी जोशी,सचिव अमोल दाडगे, श्रीनिवास भंडे,डायरेक्टर श्रध्दांनंद आपशेटटी व रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे पदाधिकारी आणि सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Tags
लातूर