प्रेमी युगुलाचे मंदिरातच अश्लील चाळे.... - latursaptrangnews

Breaking

Sunday, March 5, 2023

प्रेमी युगुलाचे मंदिरातच अश्लील चाळे....


प्रेमी युगुलाचे मंदिरातच अश्लील चाळे....

 रीवा : मध्य प्रदेशमधील रीवा जिल्ह्यामध्ये शनिवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एक प्रेमी युगुल मंदिरात बसून अश्लील कृत्य करत असताना गावातील वाहनचालकाने त्यांना अडवलं. पण यानंतर रागाच्या भरात तरुणाने असं काही केलं की यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, तरुण-तरुणी थेट मंदिरातच रोमँटिक झाले होते. गावकऱ्यांनी हे पाहिल्यानंतर त्यांना रोखण्यासाठी एक व्यक्ती पुढे गेला. त्याने आपला ट्रक उभा करून मंदिरात जात दोघांना थांबवलं. पण यानंतर रागाच्या भरात तरुण असं काही करून बसला की यामुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण आहे.

प्रेम करताना अडवल्यामुळे रागात तरुणाने थेट वाहन चालकावर गोळ्या झाडल्या. यानंतर तो आपल्या बाईकवर बसून प्रेयसीला घेऊन पळून गेला. लोकांनी गंभीर अवस्थेमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, गोळी झाडणाऱ्या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो आपल्या मैत्रिणीला स्कूटीवर बसवून गावकऱ्यांनाही बंदुकीचा धाक दाखवून घटनास्थळावरून फरार झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. हा संपूर्ण प्रकार ढाब्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे तर पोलीस आता आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.

No comments:

Post a Comment