Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित काँग्रेस भवन येथे लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार नूतन खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे जल्लोषात स्वागत




     माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित काँग्रेस

    भवन येथे लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे
    विजयी उमेदवार नूतन खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे जल्लोषात स्वागत

    लातूर (प्रतिनिधी):

    लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार, नूतन
    खासदार डॉ.शिवाजी काळगे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला. आज बुधवार
    दिनांक ५ जून २०२४ रोजी सकाळी लातूर शहरातील काँग्रेस भवन येथे माजी
    मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे
    महाविकास आघाडी सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून जल्लोषात
    स्वागत  करण्यात आले.

    यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख,माजी आमदार ईश्वरराव
    भोसीकर,माजी आमदार रोहिदास चव्हाण,माजी आमदार वैजनाथ शिंदे,माजी आमदार
    त्रंबक भिसे, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या आशाताई श्यामसुंदर
    शिंदे,शेकापचे ऍड उदय गवारे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते
    एकनाथ पवार,बालाजी रेड्डी काँग्रेसचे लातूर लोकसभा निरीक्षक अमर
    जाधव,प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, सचिव अभय
    साळुंखे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव
    सोमेश्वर कदम,लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे,
    लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे,शहर जिल्हा अध्यक्ष ऍड
    किरण जाधव,विद्याताई पाटील, महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख
    पदाधिकारी, कार्यकर्ते  उपस्थित होते

     लातूरचे नूतन खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचे काँग्रेस भवन येथे
    आगमन झाल्यावर ढोल ताशाच्या गजरात पुष्पवृष्टी करून जल्लोषात त्यांचे
    स्वागत करण्यात आले.महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी
    विजयाचे लाडू वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. लातूर लोकसभा
    मतदारसंघातील लातूर शहर,लातूर ग्रामीण,अहमदपूर,उदगीर ,लोहा कंधार ,निलंगा
     विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नूतन
    खासदार डॉ. शिवाजी काळगे व माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख,आमदार
    धीरज विलासराव देशमुख यांचे लातूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास
    आघाडीने विजय संपादन केल्याबद्दल अभिनंदन केले.  त्यानंतर आयोजित पत्रकार
    परिषदेला माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व नूतन खासदार डॉक्टर
    शिवाजी काळगे यांनी संबोधित केले.

    दरम्यान लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेसचे
    नवनिर्वाचित खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचा माजी मंत्री आमदार अमित
    विलासराव देशमुख,आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सत्कार करून त्यांना
    शुभेच्छा दिल्या.

    माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की काँग्रेस आणि
    महाविकास आघाडीच्या ध्येय,धोरणाला बांधील राहून नूतन खासदार डॉक्टर
    शिवाजी काळगे  सर्व समाज घटकांच्या हितासाठी कार्यरत राहतील या लोकसभा
    निवडणुकीत लातूरसह मराठवाडा, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात काँग्रेस पक्ष
    आणि इंडिया आघाडीच्या बाजूने जनतेने  कौल दिला असून हा कौल संविधान
    रक्षणासाठी मिळाला असल्याची आपली भावना आहे असे यावेळी बोलताना त्यांनी
    सांगितले.

    पुढे बोलताना ते म्हणाले की मराठवाड्यात महाविकास आघाडीने आठ पैकी सात
    जागा जिंकल्या असून येथे मिळालेले हे यश लक्षवेधी असल्याचे नमूद  करून
    वाढती महागाई बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळत
    नसल्यामुळे जनतेच्या मनात विद्यमान सत्ताधाऱ्यांबद्दल प्रचंड चीड
    आहे,मतदानाच्या माध्यमातून जनतेने तो राग व्यक्त केला असल्याचे निवडणूक
    निकालावरून दिसून येत आहे. अनेक समस्यांमुळे अडचणीत असलेल्या देशातील
    जनतेला आधार देण्याचे काम यापुढील काळात इंडिया आघाडी करेल असा विश्वास
    यावेळी त्यांनी व्यक्त केला.

    ते म्हणाले की या लोकसभा निवडणूक काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच
    महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते तसेच आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे
    पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या निवडणुकीत जे परिश्रम घेतले, त्याचा
    परिणाम निवडणूक निकालातून दिसून आला आहे, आघाडीच्या या यशाबद्दल आघाडीचे
    सर्व नेते , पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे हार्दिक अभिनंदन करून या
    निवडणुकीत जनतेकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला त्याबद्दलही जनतेचे
    मनःपूर्वक आभार त्यांनी मानले.

     यावेळी विजय देशमुख,रवींद्र काळे,संतोष देशमुख, गोरोबा लोखंडे,
    शिवाजीराव हुडे, लिंबन महाराज रेशमे,अविनाश रेशमे,कल्याण पाटील,सुनील
    बसपुरे, सुनील पडीले,विष्णुपंत साठे,प्रा.शिवाजी मुळे, बालाजी कदम,
    चंद्रकांत ठेंगेटोल,शरद पवार, ऍड.समद पटेल,श्याम भोसले,डॉ. अशोक पोद्दार,
    डॉ. सतीश बिराजदार,कल्याण पाटील,शीलाताई पाटील, हमीद शेख,उषा कांबळे,अजित
    माने, जितेंद्र स्वामी, डॉ. अरविंद भातांब्रे, चांदपाशा इनामदार, प्रवीण
    सूर्यवंशी, बालाजी पंडागळे, स्वयंप्रभा पाटील,प्रा.स्मिता खानापुरे,सपना
    किसवे,शितल मोरे, सुलेखा कारेपूरकर, चंद्रकांत मदे, असिफ बागवान,अभिजीत
    दिघे, महेश काळे,शरद देशमुख, रघुनाथ शिंदे, अकबर माडजे, विष्णुदास
    धायगुडे, गणेश एस.आर.देशमुख,अनिल पाटील, भैरवनाथ झडके, ऍड.देविदास बोरुळे
    पाटील, राम स्वामी, संभाजी सुळ, बालाजी साळुंखे, आनंद वैरागे, मीनाताई
    टेकाळे, शोभा ओव्हाळ,श्रीनिवास शेळके, करीम तांबोळी,किरण बनसोडे,ऍड.अंगद
    गायकवाड, आदिसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, महाविकास
    आघाडीचे विविध घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने
    उपस्थित होते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad