तीनशे मोठ्या झाडांची रोपण करून व जुन्या झाडांचा वाढदिवस साजरा करून जागतिक पर्यावरण दिवस उत्साहात साजरा.
बुधवार ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस निमित्तानआंबेजोगाई रस्त्यावरील नवीन बसस्थानक परिसरातील ऑक्सिजन झोनमध्ये ३०० झाडे लावण्याचा उपक्रम
लातूर स्त्रीरोग व प्रसूती तंत्र संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन महिला विंग, एमक्युअर फार्मा कंपनी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व ग्रीन लातूर वृक्ष टीम यांच्या पुढाकाराने पुर्ण केला.
जांभूळ, पारस पिंपळ, पांगारा, करंज, वड, पिंपळ, बेहडा, आवळा अशा पर्यावरण पूरक देशी झाडांचे रोपण करण्यात आले.
याकरिता तीन दिवसापासून खड्डे खोदणे, झाडे आणणे, झाडे लावणे, झाडांना काठ्या लावणे, झाडांना आळे करणे, परिसराची स्वच्छता करणे, गवत काढणे, उपक्रमाची तयारी करणे इतकं सगळं कार्य पूर्ण करण्यात आलं.
जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने वृक्षारोपण करण्याकरिता डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, डॉ. मनीषा बरमदे, डॉ. विमल डोळे, डॉ. क्रांती साबदे, डॉ. कल्याण बरमदे, परिवहन महामंडळाचे मांडवी साहेब, हनुमंत चपटे, ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सर्व सदस्य, आय. एम. ए. चे सदस्य, परिसरातील वृक्षप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्व पाहुण्यांच्या हस्ते झाडे लावून झाडांना पाणी देण्यात आलं.
डॉ. अर्चनाताई पाटील यांनी पर्यावरण दिनाचे महत्त्व, वृक्षारोपणाचे महत्त्व, वृक्ष संगोपनाचे महत्त्व विशद करून ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सातत्यपूर्ण कार्याचं कौतुक केलं.
यावेळी डॉ. विमल डोळे यांनी जमीन पुनर्संचयित करणे वाळवंटकरण व दुष्काळ प्रतिरोधता याबद्द्ल माहिती दिली. डॉ. कल्याण बरमदे, श्री मांडवी साहेब यांनी यावेळी यथोचित मार्गदर्शन केलं.
याबरोबरच २०२२ साली तत्कालीन पर्यावरण मंत्री श्री संजयजी बनसोडे यांच्या शुभहस्ते घनदाट वन प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला होता. त्या प्रकल्पातील झाडांचा दुसरा वाढदिवस आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.
बसस्थानकाच्या या घनदाट वन प्रकल्पामध्ये या ऑक्सिजन झोनमध्ये सध्या तीन हजार पेक्षा अधिक झाडांची संख्या असून त्या झाडांची वाढ समाधानकारक आहे यामध्ये ७० ते ८० विविध प्रजातींच्या झाडे आहेत. ग्रीन लातूर वृक्ष टीम च्या माध्यमातून या झाडांचे नियमित संगोपन केले जाते.
No comments