Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    शहरातील नागरिकांनी हरित शहर करण्यासाठी सहकार्य करावे – आयुक्त देविदास जाधव



     शहरातील नागरिकांनी हरित शहर करण्यासाठी सहकार्य करावे  – आयुक्त देविदास जाधव 


    लातूर /प्रतिनिधी: जागतिक पर्यावरण दिन व केंद्र शासन पुरस्कृत एक पेड मॉ के नाम योजना अंतर्गत लातूर शहर महानगरपालिका AMRUT व DAY-NULM व उद्यान विभाग अंतर्गत  शहरामधील पाणवठे / तलाव इतर कालवे किंवा नदी इत्यादी तसेच उद्याने शाळा महाविद्यालये शासकीय कार्यालयेइतर शासकीय जागा इत्यादी ठिकाणी झाडे लावणे व त्याचे संगोपन करणे बाबतचा उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पावसाळ्यात शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.  

               एक पेड मॉ के नाम योजना अंतर्गत शहरात दिनांक 5 जून 2025 ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत राबविण्यात येणार असून DAY- NULM मधील बचत गट सदस्य यांच्याद्वारे झाडे लावणे व त्यांचे संगोपन करण्याचे काम केले जाईल. त्या अनुषंगाने आज शहरात वकील कॉलनी विवेकानंद चौक येथे ग्रीन बेल्ट येथे उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी पर्यावरणाचे संवर्धन करणे आपली सर्वाची जबाबदारी असून यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी स्वेच्छेने यात सहभागी व्हावे व प्रत्येकानी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावेअसे सांगितले.

              यावेळी माजी नगरसेवक सचिन बंडापल्लेपर्यावरण अधिकारी सन्मती मेस्त्री क्षेत्रीय अधिकारी समाधान सूर्यवंशीसंतोष लाडलापुरे उद्यान व DAY-NULM विभागाचे कर्मचारी, CRP ( समूह संसाधन व्यक्ती )  बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.





    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad