Header Ads

  • Breaking News

    label ताज्या बातम्या

    मुरुड ग्रामपंचायतीत संविधान दिनाला उत्साही प्रतिसाद..!




     मुरुड ग्रामपंचायतीत संविधान दिनाला उत्साही प्रतिसाद..!


    मुरुड ( विशाल कणसे ):- मुरुड ग्रामपंचायतच्यावतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.


    भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक भारताच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संरचनेचे भक्कम स्वरूप तयार केले. त्यांची समानतेवरील निष्ठा, सामाजिक न्यायाची दृष्टी आणि दुर्बल घटकांच्या हक्कांवरील भूमिका आजही भारतीय लोकशाहीला दिशा देत आहे.


    संविधानाने दिलेले अधिकार उपभोगताना प्रत्येक नागरिकाने कर्तव्यांचे पालन करणे, कायद्याचा आदर ठेवणे, समानतेचा विचार जोपासणे हे आवश्यक आहे. संविधानाची खरी ताकद फक्त पुस्तकात नसून नागरिकांच्या आचरणात आहे.


    तसेच लोकशाही, स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वांचे पालन करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना ग्रामपंचायतीकडून राबविण्यात येणाऱ्या  लोकहिताच्या उपक्रमांची माहितीही देण्यात आली.


    यावेळी सरपंच अमृता अमर नाडे, उपसरपंच वैभव सापसोड, माजी उपसरपंच हनुमंत नागटिळक, अर्जुन टिळक, ग्रामपंचायत सदस्य लता भोसले, सुरज सूर्यवंशी,बालाजी सवाई, रवींद्र नाडे,विशाल कणसे, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad