आयुर्वेदिक औषध देऊन उच्चशिक्षित विवाहितेचा केला गर्भपात
परभणी : लग्नानंतर काही दिवस चांगले नांदवले. पण नंतर घर बांधण्यासाठी माहेरवरून तीन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान उच्चशिक्षित विवाहिता गर्भवती राहिली. ती गर्भवती असल्याचे कळल्यानंतर आयुर्वेदिक औषध देऊन विवाहितेचा सासरच्या मंडळींनी गर्भपात केला. याप्रकरणी उच्चशिक्षित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या मंडळी विरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
वकील असलेल्या माधुरी टिळकीकर यांचे लग्न २७ जूनला २०२१ रोजी नांदेडच्या हडकोमधील शाहू नगरमध्ये राहणाऱ्या स्वप्निल मधुकर टिळकीकर याच्याशी लग्न झाले. लग्न झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी काही दिवस त्यांना चांगले नांदवले. मात्र, त्यानंतर सासू आणि पतीने लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तुला काम येत नाही, तुला कपडे धुता येत नाहीत, तुला स्वयंपाक करता येत नाही, असे म्हणत माधुरीला किचनमध्येही जाऊ दिले नाही, असे पीडितेने म्हटले आहे.
वकील असलेल्या माधुरी टिळकीकर यांचे लग्न झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी काही दिवस त्यांना चांगले नांदवले. मात्र त्यानंतर सासरच्या मंडळींनी घर बांधण्यासाठी माहेरवरून तीन लाख रुपये घेऊन हे असा तगादा लावला. यानंतर वकील असलेल्या उच्चशिक्षित माधुरी टिळकीकर यांचा छळ करण्यास सुरुवात केली. पतीनेही त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार सुरू असताना माधुरी टिळकीकर या गर्भवती राहिल्या. त्या गर्भवती त्यानंतर सासरच्या मंडळींनी आयुर्वेदिक औषध देऊन त्यांचा गर्भपात केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.
अखेर सासरच्या छाळाला कंटाळलेल्या माधुरी टिळकीकर यांनी गंगाखेड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. त्यावरून स्वप्नील टिळकीकर, मधुकर टिळकीकर, आम्रपाली टिळकीकर, सोनाली मुळे, प्रशांत उर्फ गजु गवळी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास गंगाखेड पोलीस करत आहेत. दरम्यान मागील काही दिवसांपासून परभणीमध्ये विवाहितेचा छळ करण्यात येत असल्याचे प्रकरणी वाढले आहेत.
Tags
महाराष्ट्र