हासेगाव फार्मसीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
औसा (प्रतिनिधी) श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि प. पु. माताजी श्री निर्मलादेवी प्रणित सहजयोग आजचा महायोग यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला लातूर येथील योग शिक्षक दिपक देवत्र्य ,कल्पेश मौर्या , संगीता बिराजदार , कमला आरिदवाड ,श्रुती सदानंदे , श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर अप्पा बावगे,सचिव वेताळेश्वर बावगे , संस्थेचे कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे, प्राचार्य डॉ.श्यामलीला बावगे (जेवळे ), डॉ नितीन लोणीकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते . लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह ज्ञानसागर विद्यालय हासेगांव, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर महाविद्यालयातील एकूण ८०० विध्यार्थ्यानी योगासनांचा लाभ घेतला .
महाविद्यालातील रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश बनसोडे आणि सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. बालाजी खवले यांनी केले.
0 Comments