सोयगाव नगरपंचायती कार्यालयासमोर दिव्यांगांचे आंदोलन,
दिव्यांग आक्रमक होताच नगरपंचायत ने दिले लेखी आश्वासन.
(प्रतिनिधि मुश्ताक शाह )
सोयगाव नगरपंचायत कार्यालयासमोर सोयगाव नगरपंचायत च्या नियोजन शून्य कारभारामुळे दिव्यांगांच्या योजनेची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ होत असल्याने तसेच दिव्यांगांचा पाच टक्के तात्काळ वितरीत करण्यात यावा, दिव्यांगांना व्यवसायासाठी मोक्याच्या ठिकाणी गाळे देण्यात यावे, दिव्यांगांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा या मागण्यांसाठी दिव्यांगानी ठिय्या आंदोलन दि. १८ मंगळवार रोजी नगर पंचायत कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन चे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे व सोयगाव तालुकाध्यक्ष संदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष यासीन बेग यांच्या नेतृत्वात करण्यात आले. उशिरा लेखी आश्वासन मिळाल्याने ठिय्या आंदोलन मांगे घेण्यात आले.
दिव्यांगांचे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेपासून हे आंदोलनाला सुरवात करण्यात आली मात्र नगरपंचायत प्रशासनाने दखल न घेतल्याने दुपारी दिव्यांगानी आक्रमक झाल्याने प्रशाननाला धारेवर धरले त्यामुळे दिव्यांगांचा पाच टक्के निधी दोन दिवसात दिव्यांगाच्या बँक खात्यावर येईल असे लेखी आश्वासन दिल्याने दिव्यांगानी आंदोलन स्थगित केले. मात्र मुख्याधिकारी नगरपंचायतला आल्या नंतर सुध्दा दिव्यांगाना भेटले नसल्याने दिव्यांगानी मुख्याधिकारी यांचा निषेध दर्शविला. व उर्वरित मागण्यासाठी जिल्ह्यातील दिव्यांगाना सोबत घेऊन मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सोयगाव तालुकाध्यक्ष संदीप इंगळे यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप इंगळे, शहराध्यक्ष यासीन बेग, अनिल लोखंडे, महीला ता. अध्यक्ष मंगला जोहरे, रेखा मोरे, किशोर मोरे, हिम्मत पगारे, यांच्या सह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन दरम्यान सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण खोडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
0 Comments