दयानंद महाविद्यालयात समान संधी केंद्राचे उद्घाटन

 दयानंद महाविद्यालयात समान संधी केंद्राचे उद्घाटन

 
लातूर: दयानंद  महाविद्यालयाच्या सभागृहात  समान संधी केंद्राचे समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या  हस्ते उद्घाटन करण्यात आले.
डॉ.प्रशांत नारनवरे यांनी सांगितले की समान संधी  केंद्राच्या माध्यमातून प्राध्यापकांनीविद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती संदर्भात माहिती दिली तर विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल व विद्यार्थी जास्तीत जास्त शिष्यवृत्ती चा लाभ  घेतील समान संधी केंद्राच्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल. समान संधी केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी येणाऱ्या अडचणीचे निवारण होईल व विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही. त्या कार्यक्रमास  लातूर विभागाचे प्रादेशिक समाज उपायुक्त अविनाश देवशेठवार उस्मानाबाद जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचे बलभीम शिंदे लातूर जिल्हा जात पडताळणी समितीचे डॉक्टर तेजस माळवदकर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष नाईकवाडे आदी यावेळी उपस्थित होते दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव गायकवाड यांनी महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या समान संधी केंद्राचे माहिती आयुक्त डॉ.नारनवरे यांना दिली संस्थेचे विद्यार्थी प्राध्यापक पालक समान संधी केंद्राचे समन्वयक समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments