एलटीआर सॉफ्ट येथे कंपनीमध्ये निवड झालेल्या १२ विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार समारंभ संपन्न



एलटीआर सॉफ्ट येथे कंपनीमध्ये निवड झालेल्या १२ विद्यार्थ्यांचा व पालकांचा


सत्कार समारंभ संपन्न


लातूर दिनांक: अंबाजोगाई रोड येथील एलटीआर सॉफ्ट मधील १२ विद्यार्थ्यांची निवड अग्रगण्य कंपन्यांमध्ये

झाली आहे. या १२ विद्यार्थ्यांमधील समीक्षा भुतडा, स्मिरन गवते, वेदांत नोगजा, गणेश सागावे, किरण

कडगंची, मेघना अरसुडे, ऋतुजा मडके यांची निवड टीसीएस या मल्टिनॅशनल कंपनी मध्ये झाली आहे. तसेच

श्रद्धा मोरलावार व समीक्षा भुतडा यांची निवड मायक्रोलँड, धनराज बिरादार याची निवड विवाक्स

टेकनॉलॉजि, सुलतान शेख याची निवड एस.के.बिट टेकनॉलॉजि, शेख हारून याची निवड टीचनुक या

कंपनीत झाली आहे. या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ दिनांक १० जून रोजी आयोजित

करण्यात आला होता. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिका येथे अक्सेंचर या कंपनीत डेव्हलपर पदावर

कार्यरत असलेले श्री शंकर बंग सर, अमेरिका येथे एसव्हीजी बँक येथे युएटी टेस्टर या पदावरती कार्यरत

असलेल्या श्रीमती मंजुश्री बंग, टेकमहिन्द्रा पुणे येथे टेस्ट इंजिनियर या पदावरती कार्यरत असलेले श्री नितेश

घोडके तसेच एल टी आर सॉफ्ट चे संस्थापक व संचालक श्री किशोर जेवे, एलटीआर सॉफ्टचे सहसंस्थापक व

संचालक श्री अमोल कुंभार उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अमोल कुंभार यांनी केले. त्यांनी एलटीआर सॉफ्ट मधील रिअल टाइम प्रोजेक्ट

बेस्ड लर्निंग ची माहिती दिली. प्रमुख पाहुणे श्री शंकर बंग यांनी आजच्या युगात टेकनॉलॉजि चे महत्व व

अमेरिकेत त्यावर कसे काम होते यावर प्रकाश टाकला. श्रीमती मंजुश्री बंग यांनी अमेरिकेमधील बँकेमधील

व्यवस्था व त्यामध्ये टेक्नॉलॉजि कशी काम करते ते सांगितले. श्री नितेश घोडके यांनी कंपनीकरिता कुठल्या

कौशल्याची गरज आहे व त्याची तयारी कशी करावी यावर भर दिला. श्री किशोर जेवे यांनी आपल्या अध्यक्षीय

समारोपात एलटीआर सॉफ्ट आपल्या विध्यार्थ्यांना या टेक्नॉलॉजिच्या युगात जॉब रेडी च नाही तर उद्योजक

बनवण्याच्या दृष्टीकोनातून कशी मदत करते हे सांगितले.

या प्रसंगी विध्यार्थी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी विध्यार्थ्यांना पुढील

वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments